Wednesday, 5 June 2019

तव्यावर भाकरी जोवर उलट सुलट भाजत नाही ,
तोवर ती फुलत नाही तसेच आयुष्याचे देखील आहे ,
जोवर सुख दुखाचे चटके जोवर बसत नाहीत तोवर ते हि खुलत नाही 
पुढे जाणारा माणूस कधीच कोणाला मागे खेचत नाही 
आणि मागे खेचणारा कधीच पुढे जात नाही ,
पाठीमागे बोलणार्यांना बोलूद्यात कारण , 
त्यांच्या आयुष्यातील वेळ काढून ते आपल्या विषयी बोलत असतात.

माणसांचा संग्रह करण इतक सोप नसत ,
जितक पुस्तकांचा संग्रह करण  असत कारण 
पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते तर 
माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते 

खिशाने श्रीमंत नसला तरी चालेल ,
पण मानाने श्रीमंत नक्की बना ..........
कारण कळस जरी सोन्याचा असला तरी ,
लोक मात्र दगडाच्या पायरीवरच नतमस्तक होतात.

खूप त्रास असतानाही प्रमाणिक राहणे,
संपत्ती आसताना हि साधे राहणे, 
अधिकार असतानाही नम्र राहणे ,
रागात असतानाही शांत राहणे, यालाच जीवनाचे व्यवस्थापन म्हणतात. 

बुद्धिबळ खेळतानाही एखादी चाल मागे घ्यावी लागते 
अगदी तसच आहे या आयुष्याच 
चाल मागे घेण म्हणजे हार पत्करण अस होत नाही ,
तुम्हीच बघा चार पावलं माग आल्याशिवाय लांब उडी मारता येत नाही





No comments:

Post a Comment

8180820187