Saturday, 5 August 2017

शिवभक्ताचे प्रेमपत्र


जय शिवराय.........


                     मी राजांचा आदर्श व त्यांची शपत घेवून हे पत्र तुला लिहीत आहे .

     प्रिय.................... ,


www.prempatra.com
                              आमच्या राजांनी आम्हाला पर स्त्री वर वाईट नजरेने न पाहणेची शपत दिली आहे आणि आम्ही ती पाळतो . पण जिच्यात आपला जिव अडकला आहे तिला साकडं घालण्यात लाज कसली .
                              आजपासुन ज्यानी कुणी तुझ्यावर वाईट नजर टाकली त्याची गाठ थेट माझ्याशी असेल कारण मला हवी असलेली ती माझ्या स्वप्नांतली राणी मला मिळाली ये . का कोणास ठाऊक तुला पाहिल्यावर मला जग हरवल्यासारखं वाटलं. प्रेमाची भावना निर्माण झाली.मला प्रेम म्हणजे टाईमपास करणाऱ्यातला मी न्हवे .तुला माझ्या आयुष्यात आल्यावर माझी अर्धांगीणी देखील व्हावी लागेल
                                 माझ्या आयुष्यात जितकी लोकं आली  त्यापैकी काही चांगलीही होती आणि काही वाईटही. जि चांगली होती ती जरी निघून गेली असली तरी देखील माझ्या हृदयावर राज्य करताहेत आणि मी तुला त्या हृदयाची राणी  करायला तयार आहे आणि हा एक सांगायचं राहिलंच माझी अर्धांगिनी होणार असशील तर आणि तरच माझ्या आयुष्यात ये  नाहीतर आपण मित्र म्हणूनच ठिक आहोत मी आवडत नसेन तर विसरून जा मला पण मी कधीच विसरू शकणार नाही तुला . अगं कसं विसरू सांग ना ! कारण तु पहिलं प्रेम आहेस माझं ! आणखी काय बोलु तेच सुचेनासं झालंय बग लिहायला गेलो की फक्त चेहरा दिसतोय तुझा ....
                                    माझा राग आला असेल तर तो मझ्यावर काढ पण या पत्रावर काढू नको कारण या पत्रावर माझ्या राजांचं नावं लिहिलंय. त्यांची अशी अवहेलना झालेली मला चालणार नाही कारण ज्या हृदयाची तुला राणी करायला चाललोय त्या हृदयाचं दैवत मात्र आमचे महाराज च आहेत . तुझा काय राग असेल तो माझ्यावर काढं वेळ आल्यास चपले ने मार खाण्यास अभिमानाने उभा राहिन मी  पण राजांना काळीख फासता कामा नये .
                                   त्यामुळे जरी राग आला किंवा न आला तरी पत्र फाडू नको आणि कोणाला दाखवूही नको कारण तुला लिहीलेल्या पत्रात दुसऱ्याचा वाटा कशाला जिथं असशील तिथनं फक्त एक कॉल कर त्यावेळी आणि त्या ठिकाणाहून या पत्राला पण आणि तुला पण मी न्यायला तयार आहे .
           





                                                                                                          तुझा मित्र म्हण किंवा प्रियकर

                                                                                                                          अजय

लेखक : अजय बेडोपंत पाटील


shivbhaktajaypatil.blogspot.com

पत्र शेवटचं लिहीतो आहे


पत्र शेवटचं लिहीतो आहे


बघ ना आई वेळ आज कशी वैरीन झालीय...
तुझी भेट न घेताच माझी जाण्याची वेळ आलीय...

घायाळ जरी झालो तरी
अजूनसुद्धा लढतो आहे
आई...इंच इंच जखमा छातीवर घेऊन
पत्र शेवटचं लिहतो आहे,
पत्र शेवटचं लिहतो आहे...

लहानपणीच्या सर्वच गोष्टी आई
जशाच्या तश्या आठवतात
या बर्फ़ावरती माझ्या डोळ्यातली
आसवंसुद्धा गोठवतात
खुपदा वाटतं आई तुझ्या
कुशीत येऊन निजावं
तुझ्या प्रेमाच्या वर्षावात
पुन्हा एकदा भिजावं
पण मला ठाऊक आहे,
असं आता होणार नाही
आली वेळ मला सोडून,
रित्या हाती जाणार नाही
आपलं घर आठवून आई,
एकटाच रडतो आहे
रडता, रडता आई पत्र शेवटचं लिहतो आहे...

तुमच्यासाठी बाबा...
बरंच काही करायचं होतं
तुमच्या खांद्यावरच ओझं थोडं
माझ्या खांद्यावर घ्यायचं होतं
पहा ना बाबा !
दैवानं आपला कसा घात केला
माझ्या प्रेताचा भार सुद्धा
तुमच्याच खांद्यावरती दिला
तुमच्यासाठी काही करू शकलो नाही म्हणून...
मारणाआधीच मारतो आहे
मरता... मारता बाबा पत्र शेवटचं लिहतो आहे..

तुझ्या सगळ्या आठवणी भैय्या
मनात घर करून बसल्या आहेत
आत्ताच... चार दोन गोळ्या
उजव्या दंडात घुसल्या आहेत
उजव्या दंडात गोळी घुसताच
तुझी आठवण हेलावून गेली
मी तुझा उजवा हात आहे
असं म्हणायची वेळही आता सरून गेली
आपल्या छोट्या छकुलीची
काळजी तू घेत जा
माझ्या वाटणीची राखिसुद्धा
तूच आता बांधत जा...
आपल्या तिघांचा लहानपणीचा फोटो पाहून
एकटाच झुरतो आहे
झुरता, झुरता भैय्या पत्र शेवटचं लिहतो आहे...

रक्षाबंधनाला बांधलेला राखीचा धागा
छकुली अजून हातात आहे
यावेळची ओवाळणीही दिली नव्हती
हे ही माझ्या ध्यानात आहे
तूच सांग छकुली आता
तुला ओवाळणी काय देऊ
इथून निघून गेल्यावरती
रक्षाबंधनाला कसा येऊ
ज्या हातात राखीचा धागा आहे
त्याच हाताने लिहतो आहे
तुला आठवता आठवता
छकुली पत्र शेवटचं लिहतो आहे...

माझ्यामुळे सखे तुझं
आयुष्यच आता विराण होणार आहे
माझ्यासोबत मी तुझं
सर्वस्वच नेणार आहे
आपल्या दोन चिमण्यांना
माझा शेवटचा पापा दे
त्यांच्या डोक्यावर तुझा हात ठेवून
माझा शेवटचा आशीर्वाद दे
बघ ना सखे वेळ कशी
सर्रर्रर्...कण निघून जात आहे
काळोख माझ्या डोळ्यासमोर
थैमान घालत आहे...

आई...आई...आई ...
पुन्हा चार दोन गोळ्या
काळजामध्ये लागल्या आहेत
तश्या तुझ्या सगळ्याच आठवणी
पुन्हा मनामध्ये जागल्या आहेत
माझ्या डोळ्यासमोर आई
काळोख दाटून येतो आहे
ईच्छा नसतानाही
तुझा शेवटचा निरोप घेतो आहे

आई जमलंच तर पुन्हा मी
जीवन होऊन येणार आहे
अन त्यावेळीसुद्धा फक्त
तुझ्याच उदरी
जन्म घेणार आहे
आई तू रडू नकोस,
तुझ्या उसाश्याचा आवाज कानी येतो आहे
आवाज ऐकता, ऐकता... लढता , लढता... झुरता, झुरता... मरता, मरता पत्र शेवटचं लिहतो आहे
पत्र शेवटचं लिहतो आहे.

shivbhaktajaypatil.blogspot.com

ajaypatil08.blogspot.com

जिंकणाऱ्या विरूद्ध हरणारा


........  जिंकणाऱ्या विरुद्ध हारणारा ...........



जिंकणाऱ्याजवळ उत्तर नेहमी तयार असते ,
तर हरणाऱ्याच्या समस्या कधी पाठ सोडत नाहित .
          जिंकणारा म्हणतो आणा मी करतो ,
          हरणारा म्हणतो ते काम माझे नाही .
जिंकणाऱ्याजवळ प्रत्येक समस्येला उत्तर असतं ,
आणि हरणाऱ्याजवळ उत्तरागीण समस्या हजर असतात
          जिंकणाऱ्याला वाळुच्या बेटात हिरवळ दिसते
          तर हरणाऱ्याला हिरवळीभोवती वाळू
जिंकणाऱ्याला कठीण असलं तरी सोप दिसतं ,
हरणाऱ्याला शक्य असलं तरी कठीण दिसतं .

आणि म्हणूनच जिकणारा सहसा हारत नाही
     आणि हरणारा क्वचितच जिंकतो
बोध :

        मित्राणो नेहमी प्रयत्नार्थी रहा .जमतं झेपतं ते करत
आणि मुख्य म्हणजे कधी स्वतःला माफ करू नका आणि फसवूही
नका लवकरच तुम्ही देखील जिंकणारे व्हाल



आवडल्यास नक्की Follow आणि share करा

shivbhaktajaypatil.blogspot.com

ajaypatil08.blogspot.com