Thursday, 21 July 2022

मायाळू माझी बहिण...

जरी नसेल ती माझ्या रक्ताच्या नात्याची ..नसेल माझ्या आईच्या कुशीत वाढलेली ..
नसेल माझ्या पाठीवर माझा हात धरून आलेली ..
तरीही आहे तेवढीच जिवलग अन लाडकी माझी बहिण  .....!

ती माझ्या जीवनात आली आणि माझीच झाली
बनली होती माझ्या जिवाभावाची मैत्रीण
आता जुळलं नातं आमचं एक जिवलग भाऊ -बहिण
माझ्या इच्छेसारखीच भेटली मला जिवाभावाची एक बहिण...!

स्वभाव तिचा खूपच प्रेमळ पण जरासा हळवाच असलेला
खूपच मुडी आणि रागाचा पारा जवळच असलेला
असेलही तुसडी इतरांसाठी आठवत नाही मला माझेवर कधी रागावली
कितीही बोललो केली मस्करी केली पण  परकं तिनं कधी मानलंच नाही  ...!

जाईल जेव्हा ती आपल्या हक्काच्या घरी ..
ओठावर हसू मनी आनंद अन नयनी येईल पाणी
राखीच्या सणाला तिला बोलवून
ओवाळून जवळ घेईल तिला तिचा हा भाऊराया....!

तिची अशीच प्रेम आणि माया मजवर राहू दे ..
हे देवराया फक्त हि एकच इच्छा माझी पुरी होऊ दे ....!!

Sunday, 24 November 2019

काय असतं हे गाणं

काय असतं हे गाणं
लेखकाच्या लेखणीतून उतरलेलं भावनांचं भरीत
असतं हे गाणं
गायकाच्या कंठातून फुटलेला स्वर
असतं हे गाणं
एकटेपणात पण विश्वासाची साथ
असतं हे गाणं
पराभवाने भरलेल्या दुनियेत जिंकण्याची उमेद
असतं हे गाणं
चुकलेल्या वाटेवर मनात रंगलेली स्वप्नांची लाट
असतं हे गाणं
अर्थहीन जीवनात जगण्याची ओस
असत हे गाणं
बालपणीच्या गोष्टींचा आठवणींचा कप्पा
असत हे गाणं
आईच्या कुशीतल्या अंगाईची ऊब
असतं हे गाणं
बहिणीच्या लग्नात अश्रूंची धार
असतं हे गाणं
जात्यावरच्या दळनाला ओव्यांची मैफिल
असतं गाणं
पडद्यामागच्या कलाकाराचं  संपूर्ण जीवनच
असतं हे गाणं
लग्नाच्या वरातीत बेवड्याचा नागीण डान्स
असतं हे गाणं
निकालादिवशी विजयाचा गुलाल
असतं हे गाणं
वारकऱ्यांच्या दिंडीत नामस्मरणाचा जप
असतं हे गाणं
भजनावरच्या नाटकात कलाकाराचं सोंग
असतं हे गाणं




आठवतंय का मित्रा तुला

http://ajaypatil08.blogspot.com/2019/11/blog-post_24.html?m=1
आठवतंय का मित्रा तुला
आपण कुठं भेटलो होतो
कोण होतो काय होतो कसे होतो आणि का होतो
ना मला माहित होतं ना तुला
पण तरीही मला जवळ केलंस
का केलंस, कसं केलंस,कधी केलंस, कशासाठी केलंस
आठवतंय का मित्रा तुला
हे कधी तुला कळलं ना मला 👌

दिवसा मागे दिवस सरले
मैत्री आपली दाट झाली
लोकांच्या नजरेत आपण खुपत होतो
पण तरीही तू मला जवळ केलंस
का केलंस, कस केलंस, कधी केलंस
आठवतंय का मित्रा तुला
हे कधी तुला कळलं ना मला

जन्माला आला असशील तू परका म्हणून
पण राहिलो आपण सख्खे बनून
लोक विचार करत राहिले
यांची मैत्री एवढी अतूट कशी,
जणू कपला बशीची साथ तशी
त्या लोकांना काय कळणार हे नातं
कधी जुळलं, कुठं जुळलं, कसं जुळलं
आठवतंय का मित्रा तुला
हे कधी तुला कळलं ना मला

मनामध्ये होता एक आठवणींचा कप्पा
याच कप्प्यावर व्हायच्या आपल्या मोकळेपणाच्या गप्पा
आपण तासंतास एकमेकांजवळ
आपलं मन मोकळं करायचो
का करायचो, कधी करायचो, कुठं करायचो
आठवतंय का मित्रा तुला
हे कधी तुला कळलं ना मला

ज्या लोकांना दिला होता आपण
आपल्या मैत्रिपेक्षाही जास्त मान
त्याच लोकांनी भरले होते
खूपदा आपले कान
त्यांनी अफाट प्रयत्न केला
आपल्याला वेगळं करण्याचा
पण तरीही आपण जवळच राहिलो
का राहिलो कसं राहिलो, कशासाठी राहिलो
आठवतंय का मित्रा तुला
हे कधी तुला कळलं ना मला

ज्या लोकांनी आपल्याला वेगळं केलं
आपलं नातं संपवण्याचा प्रयत्न केला
ज्यांना आपलं नातं कुठं तरी खुपत होतं
पण त्यांच्या या कपटी भावनेला
आपली मैत्रीचं एक शस्त्र होतं
बग ना तेच लोक आपल्याला एकटं पाहिल्यानंतर
विचारतात दुसरा नमुना आहे तरी कुठं
पण आठवतंय का मित्रा तुला
ते तस का विचारत होते, कशासाठी विचारात होते
हे कधी तुला कळलं ना मला


आठवतंय का मित्रा तुला
आठवतंय का मित्रा तुला



अजय पाटील

patilajay771@gmail.com










Monday, 28 October 2019

भाऊबीज बहीण

कोण म्हणतं बहीण
ओवाळणी साठी ओवाळते
भावासाठी बिचारीचे
अंतःकरण तळमळते

भाऊरायाच्या रूपाने
माहेर येतं घरी
म्हणून येतात काळजा
आनंदाच्या सरी

या निमित्ताने तिला वाटत
भावाशी खूप बोलाव
माहेरच्या फांदीवर
क्षणभर तरी डोलाव

कशी आहेस ? एवढाच प्रश्न
सुखाऊन जातो
दुःखात सुद्धा एखाद-दुसरा
आनंद अश्रू येतो

साडी आणली का नोट
कोणी पहात नाही
भाऊ दिसे पर्यंत तिला
घास जात नाही

लग्न होऊन सासरी जाणं
खूप कठीण असतं
बाप नावाच्या आईला
सोडून जायचं असतं

उपटलेल्या रोपट्या सारखं
सोडावं लागतं माहेर
जन्मदात्या आई कडून
स्वीकारावा लागतो आहेर

वाटतो तितका हा प्रवास
सहज सोपा नसतो
भावासाठी काळजात एक
सुंदर खोपा असतो

रक्षाबंधन ,भाऊबीज हे
फक्त नाहीत सण
बहिणी साठी ते असतं
समाधानाचं धन

सुरक्षेचं कवच आणि
पाठीवरचा हात
बहिणींसाठी भाऊ म्हणजे
दुःखावरची मात

कुणीतरी आपलं आहे
भावनाच वेगळी असते
म्हणून बहीण दाराकडे
डोळे लाऊन बसते

रक्षाबंधन , भाऊबीज 
दिवस राखून ठेवा
आईच्या माघारी बहीणच
आई असते देवा

Sunday, 8 September 2019

बहिणाबाई

नाते तुझे माझे नव्हते नवे
नाते तुझे माझे हे नव्हते ही जुने
क्षणातच मला दा म्हणालीस …
व मला माझी लाडकी बहीण मिळाली….. तुला न पाहता केली मी माझी..
खूप गोड आहे ग ही जादू प्रेमाची
मनात गवसतात हिच्या अनेक सूर
आहेस माझ्या काळजात का आहेस इतकी दूर
शब्दात आहे तुझ्या एक जादू
जी लावते वेड त्या प्रत्येक शब्दाचे…
कविता लिहीतेस तू जेव्हा……
गवसतात जणू तुझ्या अतंर्मनातील सूर
जेव्हा तू गालात हसतेस खूप गोड दिसतेस
न पाहिले कधी तूला मी..पण नकळतच मनात वसतेस
आज कळ्ले तुझ्यासारखी मैत्रीण कोणच नाही…अ.. माझी बहीण…
मनच काय माझे ह्र्दयही सांगते आहेस तू माझी लाडकी.

Sunday, 23 June 2019

प्रेम कुणावर करावं

प्रेम आईवर कराव,
आईच्या ममतेवर कराव.
प्रेम वडिलांवर कराव,
वडिलांच्या कठोरतेवर कराव.
प्रेम आजी आजोबांवर कराव,
त्यांच्या संस्कारावर कराव.
प्रेम बहिणीवर कराव,
बहिणीच्या मायेवर कराव.
प्रेम भावावर कराव,
भावांच्या आधारावर कराव.
प्रेम प्रियसीवर कराव,
प्रियसीच्या लाजण्यावर कराव.
प्रेम मित्रांवर कराव,
मित्रांच्या सहवासावर कराव,
प्रेम शिवरायांवर कराव,
शंभू राजांसारख घडावं.

Wednesday, 19 June 2019

खरंच एक बहीण असावी

लहानपणी वाटे
एक बहिण असावी...
एक गोळी तीला चिमणीच्या दाताने तोडून द्यावी.
उरलेली अर्धीही तीलाच नंतर द्यावी.
एक बहिण असावी...
पाठीशी तीला घालताना आईची बोलणी खावी.
नंतर मात्र तीलाच एक ठेउन द्यावी.
एक बहिण असावी...
चीडवायला तीला फार मजा यावी.
पण रडू ती लागताच जिवाची घालमेल व्हावी.
एक बहिण असावी...
पहिल्या माझ्या पगारात तीला छान गिफ्ट आणावी.
आणि गिफ्ट हातात पडताच तिने वर पार्टीही उकळावी.
एक बहिण असावी...
असेच आणि बरेच नेहेमी मला वाटे.
एक बहिण असावी...
पण?
मला बहिण का नसावी?
त्यामुळे राखी पोर्णिमा माझी सूनी सुनी जावी....
आणि अचानक...
आयुष्यात माझ्या एक छोटुकलि यावी.
सख्खी नसेल तरिहि सख्ख्याहून सख्खी वाटावी.
एक बहिण यावी...
तीच्याशी बोलताना माझी सुख दुख्खे सांगावी...
सांगता सांगता तीचीही जाणून घ्यावी...
खरच घर मुलीशिवाय अपूर्ण असत .

माझ्या जिवलग बहिणीला शुभेच्छा रक्षाबंधनाच्या


💝 बहिणाबाई 💝
💝😘जीवनाच्या एका सुंदर
वाटेवर
वळणदार वळणावर ⏲️
एक एक पाऊल पुढे टाकत असताना
त्या सुंदर , कोमल अन प्रेमळ
मनाशी त्या व्यक्तीची माझी
भेट झाली🎁🎀💝

🎈जणू ईश्वराने त्याची सारी
शक्ती, सार वैभव, सार प्रेम 🌼
माझ्याकडे अलगद सुपूर्त केल 🎊
🎇जीवनभरासाठी 🌎
किती सुंदर, गोड अन बोलका
स्वभाव, प्रेमळ ते शब्द,
प्रेमळ ती हवी हवीशी वाटणारी
तिची साद,
😊तिचा तो हसरा चेहरा😍😘
😘वेदना चिंतांना क्षणातच दूर
करत
चेहर्यावरच प्रसन्नपणा,
टवटवीतपणा पुन्हा बहरून आणत

😥😥लहानपणी माझ ते कोवलं
मन आईकडे
हट्टच धरायचं
😣सख्खी अशी बहिण नाही म्हणून
मुसु मुसु रडायचो
मग ती हि म्हणायची
समजूत काढायची
एक अशी बहिण तुझ्यासाठी
हॉस्पिटल मधून नक्कीच😕
आपण आणायची
मग मी हि त्या बोलण्याने
आनंदून जायचो😜
खेळत बागडतच मग तसाच
पळत सुटायचो😋

आत्ता उरल्या त्या फक्त
आठवणी आणि फक्त आठवणीच
बहिणीच प्रेम काही मिळालच न्हवत


असा एकाकी पणा वाटत असताना
आपलस कुणीतरी असल्यासारखं
भर भरून प्रेम करणार,प्रेमळ नावाने
संबोधनार...काळजी करणार त्या
व्यक्तीच म्हणजेच मानलेल्या
त्या बहिणीच माझ्या जीवनात
आगमन झाल. 💐🌹🏵️

त्या प्रेमळ बहिणीला रक्षा बंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या
तिच्या सर्व इच्छा - आकांशा पूर्ण होवोत ..सुख समृद्धीने तीच जीवन भरभरून जावोत.
नेहमी हसत खेळत आनंदित रहा.......!
🌹🥀🥀💝💝

Wednesday, 5 June 2019

तव्यावर भाकरी जोवर उलट सुलट भाजत नाही ,
तोवर ती फुलत नाही तसेच आयुष्याचे देखील आहे ,
जोवर सुख दुखाचे चटके जोवर बसत नाहीत तोवर ते हि खुलत नाही 
पुढे जाणारा माणूस कधीच कोणाला मागे खेचत नाही 
आणि मागे खेचणारा कधीच पुढे जात नाही ,
पाठीमागे बोलणार्यांना बोलूद्यात कारण , 
त्यांच्या आयुष्यातील वेळ काढून ते आपल्या विषयी बोलत असतात.

माणसांचा संग्रह करण इतक सोप नसत ,
जितक पुस्तकांचा संग्रह करण  असत कारण 
पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते तर 
माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते 

खिशाने श्रीमंत नसला तरी चालेल ,
पण मानाने श्रीमंत नक्की बना ..........
कारण कळस जरी सोन्याचा असला तरी ,
लोक मात्र दगडाच्या पायरीवरच नतमस्तक होतात.

खूप त्रास असतानाही प्रमाणिक राहणे,
संपत्ती आसताना हि साधे राहणे, 
अधिकार असतानाही नम्र राहणे ,
रागात असतानाही शांत राहणे, यालाच जीवनाचे व्यवस्थापन म्हणतात. 

बुद्धिबळ खेळतानाही एखादी चाल मागे घ्यावी लागते 
अगदी तसच आहे या आयुष्याच 
चाल मागे घेण म्हणजे हार पत्करण अस होत नाही ,
तुम्हीच बघा चार पावलं माग आल्याशिवाय लांब उडी मारता येत नाही





या जगाचा मी

  माझाच माझ्याशी कधी न झालेला संवाद 


हल्ली मी आरशात पाहायचं टाळतो कारण नसते प्रश्न उभे राहातात
माझेच डोळे मज़्यक़्कदे एका अनोळखी नजरेने पाहतात 

मला शब्दांचे ठावे दिसतात या निळ्याभोर आकाशात 
मग तुम्हाला दिसते ती कविता अवचित आलेली प्रकाशात 

मी मनसोक्त रडून घेतो घरात कोणी नसल्यावर 
मग सहज हसू येत चार चौघात बसल्यावर 

मी बोलताना जरी अडखळलो तरी माझे शब्द कागदावर स्पष्ट दिसतात
बोलायला गेलो तर वेडे तोंडातच लुडबुडतात

न सांगता समजण्यासारख आपलं नात आहे 
तुमच माझ्याकडे आणि माझ तुमच्याकडे मूर्खपणाच खात आहे 

तसं बघायला गेलं तर आपण सगळेच निरागस असतो पण कधी , जन्मानंतर थोडा वेळ 
मग सुरु होतो आपलाच आपल्याशी या बनेल आयुष्याचा खेळ 

आता न हसायच्या आधी मला जरा सराव करावा  लागतो 
मनावर झालेला तो घाव जरा दाबून धरावा लागतो             

आज मलाही कळून चुकलाय कोणी कोणाच नसत 
म्हणून  म्हणतो मित्रानो आई बाबांचा लाडका च मी मस्त 

त्याचीच सांगत करावी ज्याला आपण आवडतो 
नाहींतर आपण एखाद्यासाठी आपण आपला मौल्यवान वेळ दवडतो 

मी हि आता जश्यास तस वागायचं ठरवलंय 

तू किनारा गाठलास तर मिओ तुझ्यासोबत आहे 
जर तळाशी गेलास तर मी तुझ्या आगोदर 
कारण मित्रा आता या स्पर्धेच्या जगात तू तर माझा राहिलायस कुठ 

काही नाती तुतात नाहीत भावा ती आपोआपच तुटून जातात 
जशी बोटांवर रंग ठेऊन फुलपाखर सुटून जातात 

माझ्या तळहातावर एकदा फुलपाखरू येऊन बसल 
मी सवयीन मुठ वळवणार एतक्यात विश्वासान हसल 
ते तर बिचार मूक जनावर त्याला जर मनुष्याचा स्वभाव ओळखत असेल 
तर मी तर चालता बोलता तुमच्यातलाच एक भाग आहे 

तो आला आणि त्याचा हिस्सा घेऊन गेला पण 
जाता जाता मात्र लोकांना चर्चेसाठी किस्सा देऊन गेला 

एकदा देहाबाहेर येऊन मला माझ्या देहाकडे बघायचंय 
अशक्यातली गोष्ट आहे पण मला मझ्या देहासोबत जगायचंय 

 आत्ता अस काही वाटू लागलय मित्रा 

निळभोर  आकाश आता गदगदून काळवन्डलय 
आणि हिरमुसल होऊन माझ्या तनामानातन लवण्डलय 


एवढंच मला करायचंय

एवढंच मला करायचंय .

एवढंच मला करायचंय,
खूप काही सांगायचंय , खूप खूप बोलायचंय,
तुझ्या ओठांवरील हसू पुन्हा एकदा फुलवायचंय 
भेटू एकद्सा तुला मन तुझ मागायचंय 
जीवनातल सर प्रेम फक्त तुझ्या नावावर करायचंय 
एवढ एकाच माझ स्वप्न आहे फक्त तुझ्यासोबत जगायचंय 
तुझ्या डोळ्यातल्या अश्रुना माझ्या डोळ्यात जपायचंय 
लांबून का असेना पण फक्त तुला पाहायचंय 
तुझ्यासाठी मी अन माझ्यासाठी तू एकमेकांसाठी जगायचंय 
एकमेकांसाठी जगायचंय 
एकमेकांसाठी जगायचंय 
एवढंच मला करायचंय .
एवढंच मला करायचंय .

स्वर्गीय नर्तकाच्या नजरेने धुंडाळत होतो तुला
पण या आभासात तू दिसलीस , गालातल्या गालात हसलीस 
तिथच फसलीस, नकळत का असेना 
पण माझ्या मनात बसलीस 
माझ्या मनात बसलीस
माझ्या मनात बसलीस

आता मी आरश्यात पाहताना वाटत 
कि मी मला दिसणारच नाही 
इतका तुझा झाल्यावर 
मी माझ्यापाशी असणारच नाही 

नसते उगीच भास होतात
तू यायची असलीस कि 
मग डोळे म्हणतात 
हा भासच आहे तू येताना दिसलीस कि 

सुखलेली पाण पडतात ना
वारा सुटल्यावर 
तशी तुझी स्वप्न पडत राहतात 
मी डोळे मिटल्यावर 

नेमका जो विषय टाळायचा 
तोच आपण काढतो 
आणि वादाच्या रूपाने का होईना 
आपल्या भेटीचा वेळ वाढतो 

मला माझी हर मान्य आहे 
पण तू जिंकलीस अस होत नाही 
कारण डाव जरी तुझ्या हाती दिला तरी .
जिंकता तुला येत नाही 

तरसण्याचा अनुभव
आभाळ बरसतान मी घेतला
तु न्हवतीस तर
प्रत्येक थेंब माझ्या
अंगोपांगी रुूतला

तू अस काही पाहिलस 
कि वाटल खरच पाऊस पडायला हवा 
मी अंग चोरताना तुझा तो
धिटाईचा स्पर्श घडायला हवा 

चिंब भिजल्यावर तहान लागते न 
अगदी तास होत तुला भेटल्यावर 
तुलाच पाहत बसावस वाटत 
तुझ्या कुशीत मिटल्यावर 

तू चिंब भिजल्यावर 
तुझ्या गालावरचे थेंब
गालावरच राहायला तरसतात 
क्षणभर का असेना पण ते गुरुत्वाकर्षण विसरतात 

आभाळ बरसायाच थांबल 
झाड नितळत राहिली 
पण तुझ्या प्रेमाची लाट या मनावर 
वाहतच राहिली वाहतच राहिली 

तिथे मुक्याने प्राजक्त बरसतो 
पण तू तो कधी वेचत नाहीस 
तू माझ्या पर्यंत येतेस ग 
पण मिठी कधी मारत नाहीस 


थोडं तरी जगून घ्या



आयुष्यभर सोबत असून
जवळ कधी बसत नाही
एकाच घरात राहून आम्ही
एकमेकांस दिसत नाही

हरवला तो अपापसांतला
जिव्हाळ्याचा संवाद
एकमेकांस दोष देऊन
नित्य चाले वादविवाद

धाव धाव धावतो आहे
दिशा मात्र कळत नाही
हृदयाचे पाऊल कधी
हृदयाकडे वळत नाही

इतकं जगून झालं
पण जगायलाच वेळ नाही
जगतो आहोत कशासाठी
काहीच कसला मेळ नाही

क्षण येईल एक असा
घेऊन जाईल हा श्वास
अर्ध्यावरच थांबलेला असेल
हा जीवनप्रवास

अजूनही वेळ आहे
थोडं तरी जगून घ्या
सुंदर अश्या जगण्याला
डोळे भरून बघून घ्या
💞💞💞💞💞💞💞💞💞💞

Wednesday, 24 October 2018

लक्षात नसलेला बाप

                               वडील , बाबा , पप्पा , पिता ,  आबा, लिहिण्याला बोलण्याला ऐकण्याला खूप चांगल वाटतं पण ! पण आपण जाणून भूजून शब्द उच्चारतो तो म्हणजे बाप ! होय बाप ...... 

                      त्याच बापाविषयी ठीद काही ..... 
                      

                                 आई घराचं मांगल्य असते , तर बाप घराचं अस्तित्व . 
      
                      पण घराच्या या अस्तित्वाला क्भारच आपण कधी समजून घेतलाय का ?
                    
                       बाबांना महत्व असूनही त्यांच्याविषयी जास्त बोलल जात नाही , लिहिलाही जात नाही. कोणताही व्याख्याता बाप तोंडून उमटवत नाही. पण तोच व्याख्याता आईविषयी मात्र दीर्घकाळ बोलत राहतो. संत महात्म्यांनी आईचेच महात्म्य रेखाटले आहे , देवादिकांनी आईचेच तोंड भरून कौतुक केले आहे. चांगल्या गोष्टीना आईचीच उपमा दिली जाते, पण या सगळ्यात बाप मात्र कुठंच नसतो. 
                       हा ! काही लोकांनी बाप रेखाटला पण तोही तापत ,व्यसनी मार झोड करणारा . समाजात १-२ % बाप असे असतीलही पण चांगल्या पित्यांबाद्द्ल काय ? चांगल्या वडिलांबद्दल काय ?

                              आईकडे अश्रुंचे पाट असतात तर बापाकडे सय्यमाचे घाट असतात 

                              आई रडून मोकळी होते पण सांत्वन वडिलांनाच कराव लागतं 
आणि रडणाऱ्या पेक्षा सांत्वन करणाऱ्यावरच जास्त तन पडतो ना ? 
कारण ज्योती पेक्षा समयीच जास्त तापते पण ! पण श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळत........ 
                              रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आपण किती सहजरीत्या विसरून जातो . 
                          आई रडते पण वडिलांना रडता येत नाही, स्वताचा बाप वारला तरी रडता येत नाही कारण छोट्या भावंडाना जपायचं असत आई गेली तरी रडता येत नाही कारण बहिणींना आधार व्हायचं असत. पत्नी अर्ध्यावरच सोडून गेली तरी पोरांसाठी अश्रुना आवर घालावा लागतो . 
                          जिजाऊनी शिवबा घडवला अस आवश्य म्हणव पण त्यावेळची शहाजी राजेंची ओढतानाही लक्षात घ्यावी. देवाकीच , यशोधेच कौतुक आवश्य कराव पण पुरातून पोराला डोक्यावरून घेऊन जाणारा वासुदेव देखील लक्षात ठेवावा . राम कौसल्येचा पुत्र आवश्य असेल पण वियोगात तडफडून मरण पावणारा मात्र पिता दशरथ होता. 
                         वडिलांच्या टाचा झिजलेल्या चपलांकड पाहिलं कि त्याचं प्रेम कळत. त्यांच्या फाटक्या बनियन कड पाहिलं कि कळत आमच्या नशिबाची भोकं त्यांच्या बनियनला पडली आहेत. त्यंचा तो दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो.
                         दिवाळीच्या सणाला मुलीला ड्रेस घेतील मुलाला कोट घेतील ...... !  पण स्वता मात्र जुनी विजार वापरायला काढतील. मुलगा सलून मध्ये ४०-५० रुपये करतो मुलगी पार्लर मध्ये १०० एक रुपये खर्च करते पण त्याच घरातला बाप दधिची क्रीम संपली म्हणून अंघोळीच्या साबणाने दाढी खरवडतो . अनेकदा तर तो नुसता पाणी लाऊन दाढी करतो. बाप आजारी पडला तर लवकर दवाखान्यात जात नाही , तो आजाराला मुळीच घाबरत नाही पण वैद्य एखादा महिना आराम करायला लावतील याची त्याला भीत असते. कारण पोरीच लग्न पोराच शिक्षण बाकी असत. घरात उत्पनाच दुसर साधन नसत. ऐपत नसली तरी मुलाला मेडिकलला इंजिनिअरीग्ला प्रवेश मिळवून दिला जातो. ओढाताण सहन करुन मुलाला पैसे पाठवले जातात पण सर्वच नसली तर काही मुल अशी असतात कि तारखेला पैसे येताच मित्रांना परमीट रूम मध्ये पार्ट्या देतात आणि ज्या बापाने पैसे पाठवले त्याच बापाच्या नावाने एक मेकला हाक मारतात. वडिलांची टिंगल करतात.                                                                          कोणाचा मुलगा होण टाळता येत नाही पण बाप होण टाळता येत  पण बाप कधीच बाप होण्याच तालात नाही. आईच्या असण्याला किवा आई होण्याला बापामुळेच अर्थ असतो.
                       कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते कारण ती जवळ घेते कुरवाळते कौतुक करते पण गुपचूप जाऊन पेढ्यांचा पुडा आणणारा बाप कुणाच्याच लक्षात येत नाही. पाहिलीटकरणीच खूप कौतुक होत पण दवाखान्यात अस्वस्तपणे वावरणाऱ्या त्या बापाची दाखल मात्र कोणीच घेत नाही. 
                     चटका बसला, ठेच लागली, फटका बसला  तर आईगं...... असा शब्द बाहेर पडतो पण हायवे वर रस्ता ओलांडताना एखादा ट्रक अचानकपणे ब्रेक मारतो तेव्हा बापरे.......... हाच शब्द बाहेर पडतो, कारण छोट्या छोट्या संकटाना आई चालते पण मोठी मोठी वादळ पेलताना मात्र बापच आठवतो. 
                                            काय पटतंय ना....................
                               कोणत्याही मंगल प्रसंगी सगळे जण जातात पण मैताच्या वेळी मात्र बापालाच जाव लागत. कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जास्त जात नसतो पण गरीब लेकीच्या घरी उभ्या उभ्या का होईना चक्कर मारतो. तरुण मुलगा उशिरा घरी परततो तेव्हा त्याची आई नाही .......... तर बापच जागा असतो 
                              मुलाच्या नोकरीसाठी लाचार होणारा बाप , मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप , घरच्यांसाठी स्वताच्या व्यथा दडपणारा बाप खरच किती ग्रेट असतो ना..........?
ajaypatil08.com

Wednesday, 9 May 2018

शेवटी तो कलाकारचं

काय जिंदगी आहे?
डॉक्टरला वाटत तुम्ही आजारी पडावं
वकिलाला वाटतं तुम्ही कोणतातरी गुन्हा करावा
इंजिनीरला वाटत तुम्ही कर्ज काढून का होईना पण एक घर बांधव
मेकॅनिकल ला वाटत तुमची गाडी कुठंतरी आडवळणी बँड पडावी
बँक मॅनेजरला वाटत तुम्ही कर्जबाजारी व्हावं
तर फक्त आणि फक्त एका *फोटोग्राफरला* वाटतं की तुम्ही नेहमी *हसत* रहावं          
😊 *SMILE PLEASE* 😊

Tuesday, 8 May 2018

मागणी मनातल्या प्रेमाची

मी तर तुझाच आहे तुही माझी होशील का ?
☺️💐💝
तुझ्या प्रेमानं ना माझ्या हृदयात एक घर केलंय ,
😚😘🎚️🎸🎹🥀🌹🌹
रहायला तुु येशील का ?💝💝💕😎🤔

स्वर तर तुझाच आहेे श्वास फक्तत माझा,🐦🌹🥀🌺
मागणी तर माझीच आहे💐💐💐
पण शेवटी निर्णय तुझा🌷

🥀💝💕वाट पाहतोय तुझ्या साथीची 💏👨‍❤️‍💋‍👨
💝🥀होकार तु देशील का ?😍😘😎
🐦🐦स्वप्नातल्या माझ्याा वाडयाची😆
😆😆राणी तुु होशील का ?💕💝

💝💝गरज भासली तर
🌹हक्काने हात देशील का ?💝💕💝💓💓
😜अर्धी वाट तर सारलीये🐦🌹🥀
💏ध्येयापर्यंत तू साथ येेशील का?😌👫
सांग ना ग वेडाबाई
अंधारलेल्या त्या रात्रीच्या वळणावर डबल सीट तू येशील का?

माझ्या छोट्याश्या घरट्याला
घरपण तू देशील ?
सांग ना ग एकदा
माझी अर्धांगिनी तू होशील का ?

तुझ्या प्रेमानं माझ्या हृदयात एक घर केलंय ,
😚😘🎚️🎸🎹🥀🌹🌹
रहायला तुु येशील का ?💝💝💕😎🤔

        अजय पाटील

Wednesday, 13 September 2017

प्रेमाबद्दल थोडं काही फार नाही



संस्कार


का कळत नाही पण हल्ली मन जरा कठोर झालंय
प्रेम या शब्दातला जिव्हाळा थोडा कमी झालाय
प्रेम प्रेम प्रेम बस झाल आता
अरे ! एखादी गोष्ट आयुष्यात आपली होणारच नाही मग त्या गोष्टीचा विचार करावा का
तिलाही माहितीये कि ती माझी होऊ शकत नाही
आणि मलाही माहितीये कि मी तिचा होऊ शकत नाही
दोघांची कळकळ अशी झालीये जस अळवाच पान आणि त्यावरचा थेंब
स्पर्श होऊ शकेल पण एक जीव उभ्या जन्मात शक्य नाही
माझ्या मनातल्या भावना तिच्या मनात कधीच पोचल्यात आणि तिच्या मनातल्या
भावनाही माझ्या मनात कधीच पोचल्यात
दोघांचीहि भावनेत प्रेम आहे दोघानाही माहितीये पण या भावना व्यक्त का होत नाहीत
नाही ! त्या कधीच होणार नाहीत
त्यामागे एकाच कारण असाव दोघानाही एकाच बंधनान जखडून ठेवलंय

कदर त्या प्रेमाची


💝एका मुलीने👧ने देवाला विचारलं 
प्रेम काय असत❔
देव म्हणाला बागेतून 💐💐एक फुल🌹 घेवून ये.
ती मुलगी फूल आणायला गेली,
तिला एक फूल🌸 आवडल,
💝पण तिला त्यापेक्षा सुंदर 👌फूल हव होत,
ती पुढे चालली 👣गेली,
पण तिला चांगल फूल नाही❌ मिळाल,
💝जेव्हा ती परत तेच फूल🌸 आणायला गेली,
तेव्हा ते फूल तिथे नव्हत,
तिला खूप पश्चाताप 🙈झाला,
💝तिने देवाला येऊन सांगितलं, 
तेव्हा देव म्हणाला,
"हेच_आहे_प्रेम"
💝जेव्हा प्रेम ❤तुमच्याजवळ असत.
तेव्हा त्याची कदर नाही 🙅करत,
पण जेव्हा ते निघून जाते तेव्हा कळते ते.....

Saturday, 5 August 2017

शिवभक्ताचे प्रेमपत्र


जय शिवराय.........


                     मी राजांचा आदर्श व त्यांची शपत घेवून हे पत्र तुला लिहीत आहे .

     प्रिय.................... ,


www.prempatra.com
                              आमच्या राजांनी आम्हाला पर स्त्री वर वाईट नजरेने न पाहणेची शपत दिली आहे आणि आम्ही ती पाळतो . पण जिच्यात आपला जिव अडकला आहे तिला साकडं घालण्यात लाज कसली .
                              आजपासुन ज्यानी कुणी तुझ्यावर वाईट नजर टाकली त्याची गाठ थेट माझ्याशी असेल कारण मला हवी असलेली ती माझ्या स्वप्नांतली राणी मला मिळाली ये . का कोणास ठाऊक तुला पाहिल्यावर मला जग हरवल्यासारखं वाटलं. प्रेमाची भावना निर्माण झाली.मला प्रेम म्हणजे टाईमपास करणाऱ्यातला मी न्हवे .तुला माझ्या आयुष्यात आल्यावर माझी अर्धांगीणी देखील व्हावी लागेल
                                 माझ्या आयुष्यात जितकी लोकं आली  त्यापैकी काही चांगलीही होती आणि काही वाईटही. जि चांगली होती ती जरी निघून गेली असली तरी देखील माझ्या हृदयावर राज्य करताहेत आणि मी तुला त्या हृदयाची राणी  करायला तयार आहे आणि हा एक सांगायचं राहिलंच माझी अर्धांगिनी होणार असशील तर आणि तरच माझ्या आयुष्यात ये  नाहीतर आपण मित्र म्हणूनच ठिक आहोत मी आवडत नसेन तर विसरून जा मला पण मी कधीच विसरू शकणार नाही तुला . अगं कसं विसरू सांग ना ! कारण तु पहिलं प्रेम आहेस माझं ! आणखी काय बोलु तेच सुचेनासं झालंय बग लिहायला गेलो की फक्त चेहरा दिसतोय तुझा ....
                                    माझा राग आला असेल तर तो मझ्यावर काढ पण या पत्रावर काढू नको कारण या पत्रावर माझ्या राजांचं नावं लिहिलंय. त्यांची अशी अवहेलना झालेली मला चालणार नाही कारण ज्या हृदयाची तुला राणी करायला चाललोय त्या हृदयाचं दैवत मात्र आमचे महाराज च आहेत . तुझा काय राग असेल तो माझ्यावर काढं वेळ आल्यास चपले ने मार खाण्यास अभिमानाने उभा राहिन मी  पण राजांना काळीख फासता कामा नये .
                                   त्यामुळे जरी राग आला किंवा न आला तरी पत्र फाडू नको आणि कोणाला दाखवूही नको कारण तुला लिहीलेल्या पत्रात दुसऱ्याचा वाटा कशाला जिथं असशील तिथनं फक्त एक कॉल कर त्यावेळी आणि त्या ठिकाणाहून या पत्राला पण आणि तुला पण मी न्यायला तयार आहे .
           





                                                                                                          तुझा मित्र म्हण किंवा प्रियकर

                                                                                                                          अजय

लेखक : अजय बेडोपंत पाटील


shivbhaktajaypatil.blogspot.com

पत्र शेवटचं लिहीतो आहे


पत्र शेवटचं लिहीतो आहे


बघ ना आई वेळ आज कशी वैरीन झालीय...
तुझी भेट न घेताच माझी जाण्याची वेळ आलीय...

घायाळ जरी झालो तरी
अजूनसुद्धा लढतो आहे
आई...इंच इंच जखमा छातीवर घेऊन
पत्र शेवटचं लिहतो आहे,
पत्र शेवटचं लिहतो आहे...

लहानपणीच्या सर्वच गोष्टी आई
जशाच्या तश्या आठवतात
या बर्फ़ावरती माझ्या डोळ्यातली
आसवंसुद्धा गोठवतात
खुपदा वाटतं आई तुझ्या
कुशीत येऊन निजावं
तुझ्या प्रेमाच्या वर्षावात
पुन्हा एकदा भिजावं
पण मला ठाऊक आहे,
असं आता होणार नाही
आली वेळ मला सोडून,
रित्या हाती जाणार नाही
आपलं घर आठवून आई,
एकटाच रडतो आहे
रडता, रडता आई पत्र शेवटचं लिहतो आहे...

तुमच्यासाठी बाबा...
बरंच काही करायचं होतं
तुमच्या खांद्यावरच ओझं थोडं
माझ्या खांद्यावर घ्यायचं होतं
पहा ना बाबा !
दैवानं आपला कसा घात केला
माझ्या प्रेताचा भार सुद्धा
तुमच्याच खांद्यावरती दिला
तुमच्यासाठी काही करू शकलो नाही म्हणून...
मारणाआधीच मारतो आहे
मरता... मारता बाबा पत्र शेवटचं लिहतो आहे..

तुझ्या सगळ्या आठवणी भैय्या
मनात घर करून बसल्या आहेत
आत्ताच... चार दोन गोळ्या
उजव्या दंडात घुसल्या आहेत
उजव्या दंडात गोळी घुसताच
तुझी आठवण हेलावून गेली
मी तुझा उजवा हात आहे
असं म्हणायची वेळही आता सरून गेली
आपल्या छोट्या छकुलीची
काळजी तू घेत जा
माझ्या वाटणीची राखिसुद्धा
तूच आता बांधत जा...
आपल्या तिघांचा लहानपणीचा फोटो पाहून
एकटाच झुरतो आहे
झुरता, झुरता भैय्या पत्र शेवटचं लिहतो आहे...

रक्षाबंधनाला बांधलेला राखीचा धागा
छकुली अजून हातात आहे
यावेळची ओवाळणीही दिली नव्हती
हे ही माझ्या ध्यानात आहे
तूच सांग छकुली आता
तुला ओवाळणी काय देऊ
इथून निघून गेल्यावरती
रक्षाबंधनाला कसा येऊ
ज्या हातात राखीचा धागा आहे
त्याच हाताने लिहतो आहे
तुला आठवता आठवता
छकुली पत्र शेवटचं लिहतो आहे...

माझ्यामुळे सखे तुझं
आयुष्यच आता विराण होणार आहे
माझ्यासोबत मी तुझं
सर्वस्वच नेणार आहे
आपल्या दोन चिमण्यांना
माझा शेवटचा पापा दे
त्यांच्या डोक्यावर तुझा हात ठेवून
माझा शेवटचा आशीर्वाद दे
बघ ना सखे वेळ कशी
सर्रर्रर्...कण निघून जात आहे
काळोख माझ्या डोळ्यासमोर
थैमान घालत आहे...

आई...आई...आई ...
पुन्हा चार दोन गोळ्या
काळजामध्ये लागल्या आहेत
तश्या तुझ्या सगळ्याच आठवणी
पुन्हा मनामध्ये जागल्या आहेत
माझ्या डोळ्यासमोर आई
काळोख दाटून येतो आहे
ईच्छा नसतानाही
तुझा शेवटचा निरोप घेतो आहे

आई जमलंच तर पुन्हा मी
जीवन होऊन येणार आहे
अन त्यावेळीसुद्धा फक्त
तुझ्याच उदरी
जन्म घेणार आहे
आई तू रडू नकोस,
तुझ्या उसाश्याचा आवाज कानी येतो आहे
आवाज ऐकता, ऐकता... लढता , लढता... झुरता, झुरता... मरता, मरता पत्र शेवटचं लिहतो आहे
पत्र शेवटचं लिहतो आहे.

shivbhaktajaypatil.blogspot.com

ajaypatil08.blogspot.com

जिंकणाऱ्या विरूद्ध हरणारा


........  जिंकणाऱ्या विरुद्ध हारणारा ...........



जिंकणाऱ्याजवळ उत्तर नेहमी तयार असते ,
तर हरणाऱ्याच्या समस्या कधी पाठ सोडत नाहित .
          जिंकणारा म्हणतो आणा मी करतो ,
          हरणारा म्हणतो ते काम माझे नाही .
जिंकणाऱ्याजवळ प्रत्येक समस्येला उत्तर असतं ,
आणि हरणाऱ्याजवळ उत्तरागीण समस्या हजर असतात
          जिंकणाऱ्याला वाळुच्या बेटात हिरवळ दिसते
          तर हरणाऱ्याला हिरवळीभोवती वाळू
जिंकणाऱ्याला कठीण असलं तरी सोप दिसतं ,
हरणाऱ्याला शक्य असलं तरी कठीण दिसतं .

आणि म्हणूनच जिकणारा सहसा हारत नाही
     आणि हरणारा क्वचितच जिंकतो
बोध :

        मित्राणो नेहमी प्रयत्नार्थी रहा .जमतं झेपतं ते करत
आणि मुख्य म्हणजे कधी स्वतःला माफ करू नका आणि फसवूही
नका लवकरच तुम्ही देखील जिंकणारे व्हाल



आवडल्यास नक्की Follow आणि share करा

shivbhaktajaypatil.blogspot.com

ajaypatil08.blogspot.com