Wednesday, 5 June 2019

एवढंच मला करायचंय

एवढंच मला करायचंय .

एवढंच मला करायचंय,
खूप काही सांगायचंय , खूप खूप बोलायचंय,
तुझ्या ओठांवरील हसू पुन्हा एकदा फुलवायचंय 
भेटू एकद्सा तुला मन तुझ मागायचंय 
जीवनातल सर प्रेम फक्त तुझ्या नावावर करायचंय 
एवढ एकाच माझ स्वप्न आहे फक्त तुझ्यासोबत जगायचंय 
तुझ्या डोळ्यातल्या अश्रुना माझ्या डोळ्यात जपायचंय 
लांबून का असेना पण फक्त तुला पाहायचंय 
तुझ्यासाठी मी अन माझ्यासाठी तू एकमेकांसाठी जगायचंय 
एकमेकांसाठी जगायचंय 
एकमेकांसाठी जगायचंय 
एवढंच मला करायचंय .
एवढंच मला करायचंय .

स्वर्गीय नर्तकाच्या नजरेने धुंडाळत होतो तुला
पण या आभासात तू दिसलीस , गालातल्या गालात हसलीस 
तिथच फसलीस, नकळत का असेना 
पण माझ्या मनात बसलीस 
माझ्या मनात बसलीस
माझ्या मनात बसलीस

आता मी आरश्यात पाहताना वाटत 
कि मी मला दिसणारच नाही 
इतका तुझा झाल्यावर 
मी माझ्यापाशी असणारच नाही 

नसते उगीच भास होतात
तू यायची असलीस कि 
मग डोळे म्हणतात 
हा भासच आहे तू येताना दिसलीस कि 

सुखलेली पाण पडतात ना
वारा सुटल्यावर 
तशी तुझी स्वप्न पडत राहतात 
मी डोळे मिटल्यावर 

नेमका जो विषय टाळायचा 
तोच आपण काढतो 
आणि वादाच्या रूपाने का होईना 
आपल्या भेटीचा वेळ वाढतो 

मला माझी हर मान्य आहे 
पण तू जिंकलीस अस होत नाही 
कारण डाव जरी तुझ्या हाती दिला तरी .
जिंकता तुला येत नाही 

तरसण्याचा अनुभव
आभाळ बरसतान मी घेतला
तु न्हवतीस तर
प्रत्येक थेंब माझ्या
अंगोपांगी रुूतला

तू अस काही पाहिलस 
कि वाटल खरच पाऊस पडायला हवा 
मी अंग चोरताना तुझा तो
धिटाईचा स्पर्श घडायला हवा 

चिंब भिजल्यावर तहान लागते न 
अगदी तास होत तुला भेटल्यावर 
तुलाच पाहत बसावस वाटत 
तुझ्या कुशीत मिटल्यावर 

तू चिंब भिजल्यावर 
तुझ्या गालावरचे थेंब
गालावरच राहायला तरसतात 
क्षणभर का असेना पण ते गुरुत्वाकर्षण विसरतात 

आभाळ बरसायाच थांबल 
झाड नितळत राहिली 
पण तुझ्या प्रेमाची लाट या मनावर 
वाहतच राहिली वाहतच राहिली 

तिथे मुक्याने प्राजक्त बरसतो 
पण तू तो कधी वेचत नाहीस 
तू माझ्या पर्यंत येतेस ग 
पण मिठी कधी मारत नाहीस 


No comments:

Post a Comment

8180820187