माझाच माझ्याशी कधी न झालेला संवाद
हल्ली मी आरशात पाहायचं टाळतो कारण नसते प्रश्न उभे राहातात
माझेच डोळे मज़्यक़्कदे एका अनोळखी नजरेने पाहतात
मला शब्दांचे ठावे दिसतात या निळ्याभोर आकाशात
मग तुम्हाला दिसते ती कविता अवचित आलेली प्रकाशात
मी मनसोक्त रडून घेतो घरात कोणी नसल्यावर
मग सहज हसू येत चार चौघात बसल्यावर
मी बोलताना जरी अडखळलो तरी माझे शब्द कागदावर स्पष्ट दिसतात
बोलायला गेलो तर वेडे तोंडातच लुडबुडतात
न सांगता समजण्यासारख आपलं नात आहे
तुमच माझ्याकडे आणि माझ तुमच्याकडे मूर्खपणाच खात आहे
तसं बघायला गेलं तर आपण सगळेच निरागस असतो पण कधी , जन्मानंतर थोडा वेळ
मग सुरु होतो आपलाच आपल्याशी या बनेल आयुष्याचा खेळ
आता न हसायच्या आधी मला जरा सराव करावा लागतो
मनावर झालेला तो घाव जरा दाबून धरावा लागतो
आज मलाही कळून चुकलाय कोणी कोणाच नसत
म्हणून म्हणतो मित्रानो आई बाबांचा लाडका च मी मस्त
त्याचीच सांगत करावी ज्याला आपण आवडतो
नाहींतर आपण एखाद्यासाठी आपण आपला मौल्यवान वेळ दवडतो
मी हि आता जश्यास तस वागायचं ठरवलंय
तू किनारा गाठलास तर मिओ तुझ्यासोबत आहे
जर तळाशी गेलास तर मी तुझ्या आगोदर
कारण मित्रा आता या स्पर्धेच्या जगात तू तर माझा राहिलायस कुठ
काही नाती तुतात नाहीत भावा ती आपोआपच तुटून जातात
जशी बोटांवर रंग ठेऊन फुलपाखर सुटून जातात
माझ्या तळहातावर एकदा फुलपाखरू येऊन बसल
मी सवयीन मुठ वळवणार एतक्यात विश्वासान हसल
ते तर बिचार मूक जनावर त्याला जर मनुष्याचा स्वभाव ओळखत असेल
तर मी तर चालता बोलता तुमच्यातलाच एक भाग आहे
तो आला आणि त्याचा हिस्सा घेऊन गेला पण
जाता जाता मात्र लोकांना चर्चेसाठी किस्सा देऊन गेला
एकदा देहाबाहेर येऊन मला माझ्या देहाकडे बघायचंय
अशक्यातली गोष्ट आहे पण मला मझ्या देहासोबत जगायचंय
आत्ता अस काही वाटू लागलय मित्रा
निळभोर आकाश आता गदगदून काळवन्डलय
आणि हिरमुसल होऊन माझ्या तनामानातन लवण्डलय
No comments:
Post a Comment
8180820187