Sunday, 24 November 2019

काय असतं हे गाणं

काय असतं हे गाणं
लेखकाच्या लेखणीतून उतरलेलं भावनांचं भरीत
असतं हे गाणं
गायकाच्या कंठातून फुटलेला स्वर
असतं हे गाणं
एकटेपणात पण विश्वासाची साथ
असतं हे गाणं
पराभवाने भरलेल्या दुनियेत जिंकण्याची उमेद
असतं हे गाणं
चुकलेल्या वाटेवर मनात रंगलेली स्वप्नांची लाट
असतं हे गाणं
अर्थहीन जीवनात जगण्याची ओस
असत हे गाणं
बालपणीच्या गोष्टींचा आठवणींचा कप्पा
असत हे गाणं
आईच्या कुशीतल्या अंगाईची ऊब
असतं हे गाणं
बहिणीच्या लग्नात अश्रूंची धार
असतं हे गाणं
जात्यावरच्या दळनाला ओव्यांची मैफिल
असतं गाणं
पडद्यामागच्या कलाकाराचं  संपूर्ण जीवनच
असतं हे गाणं
लग्नाच्या वरातीत बेवड्याचा नागीण डान्स
असतं हे गाणं
निकालादिवशी विजयाचा गुलाल
असतं हे गाणं
वारकऱ्यांच्या दिंडीत नामस्मरणाचा जप
असतं हे गाणं
भजनावरच्या नाटकात कलाकाराचं सोंग
असतं हे गाणं




3 comments:

  1. होय असच असतं गान. ��✌️

    ReplyDelete
  2. Mitra share kar na jar tula aavdl asel tr aani ho tuzya reply sathi mi tuza manapasun aabhari aahe

    ReplyDelete

8180820187