जरी नसेल ती माझ्या रक्ताच्या नात्याची ..नसेल माझ्या आईच्या कुशीत वाढलेली ..
नसेल माझ्या पाठीवर माझा हात धरून आलेली ..
तरीही आहे तेवढीच जिवलग अन लाडकी माझी बहिण .....!
ती माझ्या जीवनात आली आणि माझीच झाली
बनली होती माझ्या जिवाभावाची मैत्रीण
आता जुळलं नातं आमचं एक जिवलग भाऊ -बहिण
माझ्या इच्छेसारखीच भेटली मला जिवाभावाची एक बहिण...!
स्वभाव तिचा खूपच प्रेमळ पण जरासा हळवाच असलेला
खूपच मुडी आणि रागाचा पारा जवळच असलेला
असेलही तुसडी इतरांसाठी आठवत नाही मला माझेवर कधी रागावली
कितीही बोललो केली मस्करी केली पण परकं तिनं कधी मानलंच नाही ...!
जाईल जेव्हा ती आपल्या हक्काच्या घरी ..
ओठावर हसू मनी आनंद अन नयनी येईल पाणी
राखीच्या सणाला तिला बोलवून
ओवाळून जवळ घेईल तिला तिचा हा भाऊराया....!
तिची अशीच प्रेम आणि माया मजवर राहू दे ..
हे देवराया फक्त हि एकच इच्छा माझी पुरी होऊ दे ....!!

No comments:
Post a Comment
8180820187