वडील , बाबा , पप्पा , पिता , आबा, लिहिण्याला बोलण्याला ऐकण्याला खूप चांगल वाटतं पण ! पण आपण जाणून भूजून शब्द उच्चारतो तो म्हणजे बाप ! होय बाप ......
त्याच बापाविषयी ठीद काही .....
आई घराचं मांगल्य असते , तर बाप घराचं अस्तित्व .
पण घराच्या या अस्तित्वाला क्भारच आपण कधी समजून घेतलाय का ?
बाबांना महत्व असूनही त्यांच्याविषयी जास्त बोलल जात नाही , लिहिलाही जात नाही. कोणताही व्याख्याता बाप तोंडून उमटवत नाही. पण तोच व्याख्याता आईविषयी मात्र दीर्घकाळ बोलत राहतो. संत महात्म्यांनी आईचेच महात्म्य रेखाटले आहे , देवादिकांनी आईचेच तोंड भरून कौतुक केले आहे. चांगल्या गोष्टीना आईचीच उपमा दिली जाते, पण या सगळ्यात बाप मात्र कुठंच नसतो.
हा ! काही लोकांनी बाप रेखाटला पण तोही तापत ,व्यसनी मार झोड करणारा . समाजात १-२ % बाप असे असतीलही पण चांगल्या पित्यांबाद्द्ल काय ? चांगल्या वडिलांबद्दल काय ?
आईकडे अश्रुंचे पाट असतात तर बापाकडे सय्यमाचे घाट असतात
आई रडून मोकळी होते पण सांत्वन वडिलांनाच कराव लागतं
आणि रडणाऱ्या पेक्षा सांत्वन करणाऱ्यावरच जास्त तन पडतो ना ?
कारण ज्योती पेक्षा समयीच जास्त तापते पण ! पण श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळत........
रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आपण किती सहजरीत्या विसरून जातो .
आई रडते पण वडिलांना रडता येत नाही, स्वताचा बाप वारला तरी रडता येत नाही कारण छोट्या भावंडाना जपायचं असत आई गेली तरी रडता येत नाही कारण बहिणींना आधार व्हायचं असत. पत्नी अर्ध्यावरच सोडून गेली तरी पोरांसाठी अश्रुना आवर घालावा लागतो .
जिजाऊनी शिवबा घडवला अस आवश्य म्हणव पण त्यावेळची शहाजी राजेंची ओढतानाही लक्षात घ्यावी. देवाकीच , यशोधेच कौतुक आवश्य कराव पण पुरातून पोराला डोक्यावरून घेऊन जाणारा वासुदेव देखील लक्षात ठेवावा . राम कौसल्येचा पुत्र आवश्य असेल पण वियोगात तडफडून मरण पावणारा मात्र पिता दशरथ होता.
वडिलांच्या टाचा झिजलेल्या चपलांकड पाहिलं कि त्याचं प्रेम कळत. त्यांच्या फाटक्या बनियन कड पाहिलं कि कळत आमच्या नशिबाची भोकं त्यांच्या बनियनला पडली आहेत. त्यंचा तो दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो.
दिवाळीच्या सणाला मुलीला ड्रेस घेतील मुलाला कोट घेतील ...... ! पण स्वता मात्र जुनी विजार वापरायला काढतील. मुलगा सलून मध्ये ४०-५० रुपये करतो मुलगी पार्लर मध्ये १०० एक रुपये खर्च करते पण त्याच घरातला बाप दधिची क्रीम संपली म्हणून अंघोळीच्या साबणाने दाढी खरवडतो . अनेकदा तर तो नुसता पाणी लाऊन दाढी करतो. बाप आजारी पडला तर लवकर दवाखान्यात जात नाही , तो आजाराला मुळीच घाबरत नाही पण वैद्य एखादा महिना आराम करायला लावतील याची त्याला भीत असते. कारण पोरीच लग्न पोराच शिक्षण बाकी असत. घरात उत्पनाच दुसर साधन नसत. ऐपत नसली तरी मुलाला मेडिकलला इंजिनिअरीग्ला प्रवेश मिळवून दिला जातो. ओढाताण सहन करुन मुलाला पैसे पाठवले जातात पण सर्वच नसली तर काही मुल अशी असतात कि तारखेला पैसे येताच मित्रांना परमीट रूम मध्ये पार्ट्या देतात आणि ज्या बापाने पैसे पाठवले त्याच बापाच्या नावाने एक मेकला हाक मारतात. वडिलांची टिंगल करतात. कोणाचा मुलगा होण टाळता येत नाही पण बाप होण टाळता येत पण बाप कधीच बाप होण्याच तालात नाही. आईच्या असण्याला किवा आई होण्याला बापामुळेच अर्थ असतो.
कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते कारण ती जवळ घेते कुरवाळते कौतुक करते पण गुपचूप जाऊन पेढ्यांचा पुडा आणणारा बाप कुणाच्याच लक्षात येत नाही. पाहिलीटकरणीच खूप कौतुक होत पण दवाखान्यात अस्वस्तपणे वावरणाऱ्या त्या बापाची दाखल मात्र कोणीच घेत नाही.
चटका बसला, ठेच लागली, फटका बसला तर आईगं...... असा शब्द बाहेर पडतो पण हायवे वर रस्ता ओलांडताना एखादा ट्रक अचानकपणे ब्रेक मारतो तेव्हा बापरे.......... हाच शब्द बाहेर पडतो, कारण छोट्या छोट्या संकटाना आई चालते पण मोठी मोठी वादळ पेलताना मात्र बापच आठवतो.
काय पटतंय ना....................?
कोणत्याही मंगल प्रसंगी सगळे जण जातात पण मैताच्या वेळी मात्र बापालाच जाव लागत. कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जास्त जात नसतो पण गरीब लेकीच्या घरी उभ्या उभ्या का होईना चक्कर मारतो. तरुण मुलगा उशिरा घरी परततो तेव्हा त्याची आई नाही .......... तर बापच जागा असतो
मुलाच्या नोकरीसाठी लाचार होणारा बाप , मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप , घरच्यांसाठी स्वताच्या व्यथा दडपणारा बाप खरच किती ग्रेट असतो ना..........?ajaypatil08.com
No comments:
Post a Comment
8180820187