जय शिवराय.........
मी राजांचा आदर्श व त्यांची शपत घेवून हे पत्र तुला लिहीत आहे .
प्रिय.................... ,
www.prempatra.com
आमच्या राजांनी आम्हाला पर स्त्री वर वाईट नजरेने न पाहणेची शपत दिली आहे आणि आम्ही ती पाळतो . पण जिच्यात आपला जिव अडकला आहे तिला साकडं घालण्यात लाज कसली .
आजपासुन ज्यानी कुणी तुझ्यावर वाईट नजर टाकली त्याची गाठ थेट माझ्याशी असेल कारण मला हवी असलेली ती माझ्या स्वप्नांतली राणी मला मिळाली ये . का कोणास ठाऊक तुला पाहिल्यावर मला जग हरवल्यासारखं वाटलं. प्रेमाची भावना निर्माण झाली.मला प्रेम म्हणजे टाईमपास करणाऱ्यातला मी न्हवे .तुला माझ्या आयुष्यात आल्यावर माझी अर्धांगीणी देखील व्हावी लागेल
माझ्या आयुष्यात जितकी लोकं आली त्यापैकी काही चांगलीही होती आणि काही वाईटही. जि चांगली होती ती जरी निघून गेली असली तरी देखील माझ्या हृदयावर राज्य करताहेत आणि मी तुला त्या हृदयाची राणी करायला तयार आहे आणि हा एक सांगायचं राहिलंच माझी अर्धांगिनी होणार असशील तर आणि तरच माझ्या आयुष्यात ये नाहीतर आपण मित्र म्हणूनच ठिक आहोत मी आवडत नसेन तर विसरून जा मला पण मी कधीच विसरू शकणार नाही तुला . अगं कसं विसरू सांग ना ! कारण तु पहिलं प्रेम आहेस माझं ! आणखी काय बोलु तेच सुचेनासं झालंय बग लिहायला गेलो की फक्त चेहरा दिसतोय तुझा ....
माझा राग आला असेल तर तो मझ्यावर काढ पण या पत्रावर काढू नको कारण या पत्रावर माझ्या राजांचं नावं लिहिलंय. त्यांची अशी अवहेलना झालेली मला चालणार नाही कारण ज्या हृदयाची तुला राणी करायला चाललोय त्या हृदयाचं दैवत मात्र आमचे महाराज च आहेत . तुझा काय राग असेल तो माझ्यावर काढं वेळ आल्यास चपले ने मार खाण्यास अभिमानाने उभा राहिन मी पण राजांना काळीख फासता कामा नये .
त्यामुळे जरी राग आला किंवा न आला तरी पत्र फाडू नको आणि कोणाला दाखवूही नको कारण तुला लिहीलेल्या पत्रात दुसऱ्याचा वाटा कशाला जिथं असशील तिथनं फक्त एक कॉल कर त्यावेळी आणि त्या ठिकाणाहून या पत्राला पण आणि तुला पण मी न्यायला तयार आहे .
तुझा मित्र म्हण किंवा प्रियकर
अजय
No comments:
Post a Comment
8180820187